असतील शिते तर जमतील भूते
|
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की
त्याच्याभोवती माणसे गोळा होतात
|
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
|
दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी
जीवालाही धोका निर्माण होतो
|
अडला हरी गाढवाचे पाय धरी
|
एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या
वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते
|
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
|
जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे
मुळीच काम होत नाही
|
अति तेथे माती
|
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान
कारक असतो
|
अन्नछत्री जेवणे, वर
मिरपूड मागणे
|
दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची
त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
|
अंगाले सुटली खाज, हाताला
नाही लाज
|
गरजवंताला अक्कल नसते
|
अंगावरचे लेणे, जन्मभर
देणे
|
दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते
जन्मभर फेरीत बसायचे.
|
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
|
मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक
दुःखदायक असतात.
|
अंधारात केले, पण
उजेडात आले
|
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती
काही दिवसांनी उजेडात येतेच
|
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
|
नाव मोठे लक्षण खोटे
|
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
|
अशक्यकोटीतील गोष्टी
|
अती झाले अन आसू आले
|
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी
ठरते
|
अतिपरिचयात अवज्ञा
|
जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो
|
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
|
कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच
|
अन्नाचा येते वास, कोरीचा
घेते घास
|
अन्न न खाणे;पण
त्यात मन असणे
|
अपापाचा माल गपापा
|
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने
नष्ट होते.
|
अर्थी दान महापुण्य
|
गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
|
आईची माया अन् पोर जाईल वाया
|
फार लाड केले तर मुले बिघडतात
|
आधी पोटोबा मग विठोबा
|
प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर
देव – धर्म करणे
|
आपलेच दात आपलेच ओठ
|
आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची
परिस्थिती निर्माण होते.
|
आयत्या बिळावर नागोबा
|
एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता
फायदा घेण्याची वृत्ती असणे.
|
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
|
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
|
आपण हसे लोळायला, शेंबूड
आपल्या नाकाला
|
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो, तो
दोष आपल्या अंगी असणे
|
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
|
मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत
त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.
|
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं
|
एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा
घ्यावा.
|
आंधळ्या बहिर्यांची गाठ
|
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन
माणसांची गाठ पडणे.
|
अगं अगं म्हशी, मला
कुठे नेशी ?
|
चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही,
उलटी
ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे.
|
अडली गाय फटके खाय
|
एखादा माणूस अडचणीत सापडला, की
त्याला हैराण केले जाते.
|
आपला हात जगन्नाथ
|
आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून
असते.
|
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा
|
अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल
तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
|
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?
|
कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
|
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप
|
अतिशय उतावळेपणाची कृती.
|
अती खाणे मसणात जाणे
|
अति खाणे नुकसानकारक असते.
|
अठरा नखी खेटरे राखी, वीस
नखी घर राखी
|
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.
|
अवचित पडे, नि
दंडवत घडे
|
स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
|
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे
|
एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.
|
अंथरूण पाहून पाय पसरावे
|
आपली ऐपत, वकूब
पाहून वागावे.
|
अंगापेक्षा बोंगा मोठा
|
मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा
बडेजाव मोठा असणे.
|
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे
|
स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार
दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
|
आपली पाठ आपणास दिसत नाही
|
स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.
|
आजा मेला नातू झाला
|
एखादे नुकसान झाले असता, त्याच
वेळी फायद्याची गोष्ट घडणे.
|
आत्याबाईला जर मिशा असत्या तर
|
नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा
विचार करणे.
|
आपल्याच पोळीवर तूप ओढणे
|
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
|
आलिया भोगासी असावे सादर
|
तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती
स्वीकारणे.
|
आवळा देऊन कोहळा काढणे
|
आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला
लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
|
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही
|
अनुभवाशिवाय शहाणपण नसते.
|
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन
|
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे
नुकसान करून घेणे.
|
आधीच तारे, त्यात
गेले वारे
|
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना
घडणे.
|
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
|
आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने
अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.
|
अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा
|
मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च
जास्त असणे.
|
आग रामेश्वरी, बंब
सोमेश्वर
|
रोग एकीकडे, उपाय
भलतीकडे.
|
आयजीच्या जीवावर बायजी उदार
|
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
|
आग खाईल तो कोळसे ओकेल
|
जशी करणी तसे फळ
|
आठ पूरभय्ये नऊ चौबे
|
खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान
पुरेसे.
|
आधणातले रडतात व सुपातले हसतात
|
संंकटात असतानाही दुसर्याचे दुःख पाहून हसू
येते.
|
इकडे आड तिकडे विहीर
|
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
निर्माण होणे.
|
इच्छा परा ते येई घरा
|
आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच
आपल्या वाट्याला येणे.
|
इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते
|
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान
झाले असते.
|
इन मीन साडेतीन
|
एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर
असणे.
|
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो
|
जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
|
उथळ पाण्याला खळखळाट फार
|
अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई
मारतो.
|
उंदराला मांजर साक्ष
|
ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या
गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते
किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.
|
उचलली जीभ लावली टाळ्याला
|
दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे
|
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
|
अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
|
उठता लाथ बसता बुक्की
|
प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी
पुन्हापुन्हा शिक्षा करणे.
|
उडत्या पाखराची पिसे मोजणे
|
अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड
गोष्टीची परीक्षा करणे.
|
उतावळी बावरी (नवरी) म्हातार्याची नवरी
|
अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
|
उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी
|
जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
|
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले
|
फायद्याची वेळी येणे; पण
लाभ न घेता येणे.
|
ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे
|
अतिशय हलाखीची स्थिती.
|
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
|
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम
करतो.
|
उकराल माती तर पिकतील मोती
|
मशागत केल्यास चांगले पीक येते.
|
उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?
|
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी
पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
|
उचल पत्रावळी, म्हणे
जेवणारे किती?
|
जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा
करणे.
|
उडाला तर कावळा, बुडाला
तर बेडूक
|
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही
काळ वाट पहावी लागते.
|
उधारीची पोते, सव्वा
हात रिते
|
उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
|
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे
|
श्रीमंती आली की, तिच्या
मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.
|
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे
|
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली
मान घालून जाणे.
|
उसाच्या पोटी कापूस
|
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.
|
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये
|
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा
चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
|
एका माळेचे मणी
|
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
|
एका हाताने टाळी वाजत नाही
|
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष
देता येत नाही.
|
एक ना धड भाराभर चिंध्या
|
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच
कामे अर्धवट होण्याची अवस्था.
|
एकावे जनाचे करावे मनाचे
|
लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे
योग्य वाटेल ते करावे.
|
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो
विडी
|
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही
स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
|
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु
नये
|
दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे
बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
|
एका पिसाने मोर होत नाही
|
थोड्याश्या यशाने हुरळून जाणे
|
एका खांबावर द्वारका
|
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
|
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
|
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
|
एका कानावर पगडी, घरी
बाईल उघडी
|
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
|
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत
|
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत
नाहीत.
|
ऐंशी तेथे पंचाऐंशी
|
अतिशय उधळेपणाची कृती.
|
ऐरावत रत्न थोर | त्यासी
अंकुशाचा मार |
|
मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
|
ओळखीचा चोर जीवे न सोडली
|
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर
असतो.
|
ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो
की तारंबी तुटो
|
कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
|
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?
|
सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
|
औटघटकेचे राज्य
|
अल्पकाळ टिकणारी गोष्ट.
|
करावे तसे भरावे
|
जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले /
वाईट फळ मिळणे.
|
कर नाही त्याला डर कशाला ?
|
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली
नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?
|
करीन ते पूर्व
|
मी करेन ते योग्य, मी
म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
|
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे
सरली तरी कापते
|
काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही
केल्या तरी नुकसान होते.
|
करुन करुन भागला, देवध्यानी
लागला
|
भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
|
कणगीत दाणा तर भिल उताणा
|
गरजेपुरते जवळ असले, कि
लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
|
कधी तुपाशी तर कधी उपाशी
|
सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.
|
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय
|
वाईटात आणखी वाईट घडणे
|
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
|
रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.
|
काडीचोर तो माडीचोर
|
एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर
त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.
|
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती
|
गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.
|
का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ
|
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
|
कानात बुगडी, गावात
फुगडी
|
आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे
प्रदर्शन करणे.
|
काल महिला आणि आज पितर झाला
|
अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
|
काकडीची चोरी फाशीची शिक्षा
|
अपराध खूप लहान; पण
त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
|
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत
नाही
|
जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते
थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची
ठरते.
|
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
|
पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
|
मल्हारी माहात्म्य
|
नको तिथे नको ती गोष्ट करणे.
|
काना मागुन आली आणि तिखट झाली
|
श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
|
कामापुरता मामा
|
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
|
कावळा बसला आणि फांदी तुटली
|
परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन
गोष्टी एकाच वेळी घडणे
|
काखेत कळसा गावाला वळसा
|
जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे
|
काप गेले नी भोके राहिली
|
वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या
|
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
|
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे
नुकसान होत नसते.
|
काळ आला; पण
वेळ आली नव्हती
|
नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात
बचावणे.
|
कांदा पडला पेवात, पिसा
हिंडे गावात
|
चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा
करणे.
|
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
|
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते
विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
|
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे
|
मूळचा स्वभाव बदलत नाही.
|
कुडी तशी फोडी
|
देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
|
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
|
स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला
मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
|
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी
|
अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
|
केस उपटल्याने का मढे हलके होते ?
|
जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या
उपायांनी काही होत नाही.
|
केळी खाता हरखले, हिशेब
देता चरकले
|
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते
मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
|
कोळसा उगाळावा तितका काळाच
|
वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती
वाईट ठरते.
|
कोल्हा काकडीला राजी
|
लहान लहान गोष्टींनी खुश होतात.
|
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी
|
चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
|
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे
श्यामभट्टाची तट्टाणी
|
महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना
करणे.
|
खऱ्याला मरण नाही
|
खरे कधीच लपत नाही.
|
खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट
दुखते
|
खर्च करणार्याचा खर्च होतो ; तो
त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर
करतो.
|
खाऊ जाणे तो पचवू जाणे
|
एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम
भोगण्यास ही समर्थ असतो.
|
खान तशी माती
|
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन
असणे.
|
खायला काळ भुईला भार
|
निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
|
खाई त्याला खवखवे
|
जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
|
खाऊन माजावे टाकून माजू नये
|
पैशाचा, संपत्तीचा
गैरवापर करू नये.
|
खोट्याच्या कपाळी गोटा
|
खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
|
Friday, 14 December 2018
म्हणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment