Friday, 14 December 2018

सुविचार

 

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.


अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.


आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.



आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

No comments:

Post a Comment